#SCO2022Samarkand : PM Modi : भारत औद्योगिक निर्मिती केंद्र बनवण्याचे ध्येय
भारताला औद्योगिक निर्मितीचे प्रमुख केंद्र बनवण्याचे ध्येय आहे अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी SCO शिखर परिषदेत व्यक्त केली आहे. उझबेकिस्तानमध्ये सुरू असलेल्या #SCO2022Samarkand या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत. याच परिषदेत रशियाचे अध्यक्ष पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष सहभागी झाले आहेत.
भारतामध्ये ७० हजार स्टार्टअप्स सुरू आहेत, जनकेंद्रीय विकासाच्या दृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत, त्यासाठी नाविन्यपूर्णता आणि संशोधनावर भर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पारंपरिक औषधांबाबत नवीन SCO वर्किंग ग्रुप स्थापन करण्यासाठी भारत पुढाकार घेईल असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.