तब्बल दीड वर्षानंतर राज्यात शाळांना पुन्हा सुरुवात झाली आहे. ८ वी ते १२वीचे वर्ग पुन्हा सुरू झाले आहेत. शाळा सुरू झाल्यामुळे मित्र, शिक्षक व शाळेचा परिसर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. पण गेले दोन वर्ष ऑनलाइन अभ्यासक्रम असल्यामुळे आता ऑफलाईन परीक्षा घेऊ नये अशी मागणीसुद्धा काही विद्यार्थ्यांनी केली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील एम एस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळा सुरू झाल्याचा आनंद व्यक्त करतानाच आता चार महिन्यांमध्ये ऑफलाईन परीक्षा देणे हे खूप कठीण असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच शाळा सुरू झाल्याचा आनंद असला तरी परीक्षा मात्र त्यांनी ऑनलाइनच घ्यावी अशी मागणी सुद्धा या विद्यार्थ्यांनी केली आहे. हे सर्व विद्यार्थी इयत्ता नववी व दहावीच्या वर्गातील आहेत.