कोरोना महामारीमुळे तब्बल अठरा महीने बंद असलेल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह मुंबईतल्या शाळा आजपासून सुरु झाल्या आहे. आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु करण्यात आले, त्यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमधे मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला.
मुंबई सर्वच शाळांमधे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान, ऑक्सीजन लेवल तपासून घेण्यात येत होती. शाळेकडून विद्यार्थांना मास्क देण्यात आले. शिवाय प्रवेश करतेवेळी सॅनिटायझरच्या मदतीने विद्यार्थ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सुरवातीच्या टप्प्यात कमी संख्येने विद्यार्थी बोलावण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक विद्यार्थाला शाळेत येणाचे बंधन नाही. अनेक शाळामधे वाद्य वाजवून विद्यार्थांचे स्वागत करण्यात आले.
मुंबई शहरातील सायन कोळीवाळा परीसरातील मुंबई मनपा शाळेत आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी आज सकाळी शिक्षक,स्थानिक नगरसेवक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळाप्रवेशावरील रिपोर्ट...