राज्यभरातील विद्यार्थी-पालकांसाठी मोठी बातमी: 4 ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार ?

कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार असून शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी मंजुर झाली असून करोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही तर ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी आणि शहरी भागातील ८ ते १२ वी चे वर्ग सुरू होतील अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.;

Update: 2021-09-24 12:18 GMT

कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु होणार असून शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी मंजुर झाली असून करोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही तर ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी आणि शहरी भागातील ८ ते १२ वी चे वर्ग सुरू होतील अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

कोरोनाच्या संकटात अनेकदा शाळा सुरु करण्याच्या घोषणा झाल्या होत्या. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता शिक्षण विभाग शाळा सुरु करण्याबाबत सांश क होता. मात्र आता शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकराने नेमलेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक असून कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास त्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

गणेशोत्सवात कोरोनाचे आकडे फारसे वाढलेले दिसत नाहीये. शिवाय आणखी गणेशोत्सवनंतरचे 10 ते 12 दिवस कोरोना स्थितीचा आढावा घेऊन सोबतच दिवाळी सारख्या मोठ्या सणाच्या दरम्यान कोरोना परिस्थिती पाहून दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे चाइल्ड टास्क फोर्सने सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यास खुद्द मुख्यमंत्र्यांनीच परवानगी दिली आहे. ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी आणि शहरी भागातील ८ ते १२ वी चे वर्ग सुरू होतील अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

शाळा सुरु करण्यापूर्वी शाळांना मोठी तयारी करावी लागणार आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे, शाळा सॅनिटाइज करणे, शाळेत आरोग्य कक्ष तयार ठेवणे असे आव्हान शाळांपुढे आहे. टास्क फोर्स किंवा राज्य सरकारच्या शाळा सुरू करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना या जिल्हास्तरावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पाळायच्या आहेत. त्यामुळे स्थानिक कोरोना परिस्थितीचा विचार करून त्यानुसार शाळा सुरू करण्याबाबतचा नियोजन जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या आदेशानुसार होईल. शिक्षण विभागाने लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांची माहीती मागवली असून शाळा सुरू करण्याबाबतची तयारी सुरू ठेवली आहे. सोबतच मुंबई महापालिका शिक्षण विभाग सुद्धा शाळा सुरू करण्याबाबतच्या तयारी सरु आहे.

Tags:    

Similar News