सावित्रीच्या विचारांचा जागर नाटकातून...

Update: 2025-01-05 12:30 GMT

समतावादी,संविधानसंमत भारत निर्माणासाठी समर्पित नाटक लोक-शास्त्र सावित्री

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने राज्यभर प्रस्तुत होणार.

3 जानेवारी 2025, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवन्स चे रंगकर्मी "सांस्कृतिक सृजनकार" हा रचनात्मक पुढाकार घेऊन,"लोक-शास्त्र सावित्री" नाट्य जागर साजरा करीत आहेत. 3 जानेवारी 2025 ते 10 मार्च 2025 दरम्यान होणाऱ्या या नाट्यमालिकेत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित “लोक- शास्त्र सावित्री” नाटकाचा जागर राज्यभर प्रस्तुत होणार आहे.

थिएटर ऑफ रेलेवन्स - लोक-शास्त्र सावित्री" नाट्य जागर

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे विश्वास, अस्तित्व आणि विचार ! सावित्री बाईंनी पितृसत्ता ,सामंतवाद, जातीवाद यांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिले होते. या विचारांची मशाल घेऊन राज्यभर "लोक-शास्त्र सावित्री" या नाटकाचा जागर होणार आहे.

सावित्रीबाई यांच्या काळातले प्रश्‍न कमी जास्त प्रमाणात आजही तसेच आहेत, आणि याला भेदण्यासाठी आपली काय भूमिका आहे हा प्रश्न ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चे रंगकर्मी घेऊन आले आहेत. अस्तित्वाचा शोध सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाईंनी घेतला होता. सावित्री बाईंनी पितृसत्ता, सामंतवाद, जातीवाद यांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिले होते. त्यांनी अज्ञानाच्या फेऱ्यातून अखंड समाजाला बाहेर काढले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ठ रुढींच्या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी समाजाला प्रेरित केले. आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला. त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात अजूनही धगधगते का ?

जनमानसात सावित्रीबाई फुलेंची ओळख आहे, त्यांचे नाव आहे परंतु त्यांचे तत्व रुजले नाही, आणि हे तत्व रुजवण्याची प्रक्रिया "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक करते. सावित्री म्हणजे विचार !प्रत्येक व्यक्तीच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने ती लोप पावते. प्रत्येकाच्या मनातील सावित्रीला चिन्हीत करण्यासाठी हे नाटक पुढाकार घेते.

१८३१ पासून आतापर्यंतच्या काळाचा आलेख घेतला तर लक्षात येईल, त्या काळापासून सुरू झालेले सांस्कृतिक प्रबोधन जागतिकीकरणाने संपवले आहे. सावित्रीच्या प्रतिरोधाला प्रचारकी व्यक्तिवादाचे स्वरूप देऊन अलगदपणे सर्वसामान्य केले.सावित्रीचा जो प्रतिरोध होता त्याची ताकद संपवली.आता हा प्रतिरोधाचा न्याय पताका घेऊन, "थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत" "लोक- शास्त्र सावित्री" या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या महत्वाला, तिच्या विचाराला जनमानसात जागवत आहे.

सावित्रीच्या तत्वज्ञानाला नवीन पिढीत रुजवण्यासाठी आणि न्याय, समता व समानतेचा पाया मजबूत करण्यासाठी आपला सहभाग महत्त्वाचा आहे ! चला, या वैचारिक सांस्कृतिक नाट्यजागरात सामील होऊया आणि सावित्रीच्या विचारांचा जागर जनमानसात घडवूया!

हम हैं!

Full View


Tags:    

Similar News