मुंबई, ०३ जानेवारी २०२५: सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई "क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती" उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्यिक, कवी, विचारवंत प्रा. आशालता कांबळे यांनी उपस्थित राहून सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
प्रा. आशालता कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक योगदान, सामाजिक क्रांतीतील महत्त्व आणि म. फुले यांच्या तीन पत्रातील मजकूर आणि आजच्या संदर्भातील उपयुक्तता सांगितली तसेच स्त्रीसक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांवर सखोल व्याख्यान दिले. त्यांनी सावित्रीबाईंच्या विचारांची आजच्या काळातील महत्त्वपूर्ण आवश्यकता स्पष्ट केली.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून व बुद्ध वंदनेनी झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सुनतकरी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. ज्योती परुळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर परिचय डॉ. सुनिता गायकवाड यांनी करून दिला. याप्रसंगी प्रा. रमेश झाडे, प्रा. डॉ. बी. डब्ल्यू. गायकवाड मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शिक्षक - शिक्षकेत्तर वर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी आर्या रावराणे यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी स्नेहल साळवे यांनी केले. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी असा कार्यक्रम प्रेरणादायी ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.