मंत्री सतेज पाटील यांचा आगळावेगळा वाढदिवस, रितेश देशमुखसह राज्यातील मंत्री म्हणाले…

मंत्री सतेज पाटील यांचा आगळावेगळा वाढदिवस, रितेश देशमुखसह राज्यातील मंत्री म्हणाले… satej patil birthday wish i am use mask You also use Mask;

Update: 2021-04-13 05:53 GMT


कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीची झलक महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिसली. वाढदिवसाचे सोहळे न करता गृहराज्यमंत्र्यांनी "मी मास्क वापरतो, तुम्हीही वापरा" याच शुभेच्छा द्या, असे आवाहन केले. राज्यभरातील नेत्यांनी, नागरीकांनी आणि कार्यकर्त्यांनी व्हिडिओतून आणि सोशल मीडियाद्वारे मास्कसह त्यांना शुभेच्छा देत प्रतिसाद दिला. प्रतिसाद देणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे नेते, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार धीरज देशमुख यांच्यासह शेकडो नेते-कार्यकर्त्यांचा समावेश होता. याशिवाय अभिनेते रितेश देशमुख, आर माधवन यांनीही या मोहिमेत सहभागी होऊन लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले.

वाढदिवसाचा हा विधायक सामाजिक पॅटर्न ठरला आहे. सोशल मीडियावर तब्बल पन्नास लाखांवर लोकांपर्यंत ही मोहिम पोहोचली. कोल्हापुरात पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी शहर आणि जिल्हा परिसरात मास्कचे वाटप केले.





Tags:    

Similar News