अफगाणिस्तानच्या सारा करीमीने जगाला एक पत्र लिहून मदतीचे आवाहन केले

अफगाणिस्तानच्या चित्रपट निर्माती सारा करीमीने जगाला एक पत्र लिहून मदतीचे आवाहन केले आहे. सारा यांचे पत्र बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे;

Update: 2021-08-17 05:55 GMT

अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता स्थापन केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला आहे. उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही देश सोडला आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या भायानक चित्र पाहायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमधील चित्रपट निर्माती सारा करीमीने जगाला एक पत्र लिहून मदतीचे आवाहन केले आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सारा करीमीची पोस्ट शेअर केली आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत साराने लिहिलेल्या पत्रात लोकांना एकत्र येऊन या विरोधात लढण्याचे आवाहन केले आहे. अनुरागने कश्यपने साराची ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

साराने अफगाणिस्तानमधील सद्य परिस्थिती कशी आहे हे सांगितेल आहे. तालिबानी लोक अफगाणिस्तानमधील महिलांवर कशाप्रकारे अत्याचार आणि जबरदस्ती करत आहेत याबाबत साराने भाष्य करत म्हटले आहे की, तालिबानी हे कलाकार, इतिहासकार, सरकारी नोकर सर्वांनाच मारत आहेत.

तालिबानींच्या या कृत्यामुळे देशातील कलेचा नाश होईल.असं साराने म्हंटले आहे. मी आणि इतर काही चित्रपट निर्माते त्यांच्या हिट लिस्टवर आहोत. आमच्या जिवाला तालिबानींचा धोका आहे. काही आठवड्यांमध्येच तालिबानी लोकांनी अफगाणिस्तानमधील शाळा उद्धवस्त केल्या. जवळपास 90 लाख मुलींचे भविष्य त्यामुळे धोक्यात आल्याचे साराने आपल्या पत्रात लिहिले आहे.

Tags:    

Similar News