पृथ्वी शॉला क चूक पडली महागात...

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या सहारा हॉटेल परिसरात पृथ्वी शॉच्या गाडीवर काही अज्ञातांनी हल्ला केला होता. त्यामध्ये पृथ्वी शॉ थोडक्यात बचावला होता. हे प्रकरण शांत करण्यासाठी त्यावेळी सपना गिलने शॉवर खोटे आरोप लावत त्याल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. आणि आता तर सपना गिलने क्रिकेटर पृथ्वी शॉवर विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे.;

Update: 2023-02-21 14:36 GMT

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सोबत सेल्फी घेण्यावरुन सुरु झालेला वाद आता थेट न्यायालयात पोहचला आहे. हा वाद फक्त सेल्फी घेण्यावरून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत जरी असले तरी आता याप्रकरणातील आरोपींना जामिन मिळाल्यावर त्यातील आरोपी सपना गिल (Sapna Gill) हिने पृथ्वी शॉ विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पृथ्वी शॉ विरोधात सपना यांच्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीमध्ये पृथ्वी शॉ शिवाय आशिष सुरेंद्र यादव (Ashish Surendra Yadav), ब्रिजेश (Bridgesh) आणि इतरांविरुद्ध सपना गिलसोबत विनयभंग केल्याप्रकरणी फौजदारी तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली असल्याची माहिती सपना गिलचे वकील अली काशिफ देशमुख (Ali Kashif Deshmukh) यांनी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

सपना गिलचे वकील अली काशिफ देशमुख यांनी पृथ्वी शॉ आणि इतरांवर कलम ३४, १२०बी, १४४, १४६, १४८, १४९, ३२३, ३२४, ३५१, ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना गिलला सोमवारी या प्रकरणात जामीन मिळालेला आहे. गिल हिच्यासह तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पृथ्वी शॉ सोबत सेल्फी घेण्यावरुन मुंबईत वाद झाला होता. या दरम्यान सपना गिलचा पृथ्वी शॉसोबत वाद झाला. तसेच त्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. नंतर ओशिवरा पोलिसांनी पृथ्वीला दुसऱ्या गाडीतून घरी पाठवले होते.

Tags:    

Similar News