संसद टिव्हीचे युट्युब चॅनेल हॅक?

Update: 2022-02-15 08:08 GMT

अलिकडच्या काळात प्रसिध्दीला पावलेले भारतीय संसदेच्या अखत्यारीत संसद टिव्हीचे युट्युब चॅनेल हॅक झाल्याचे वृत्त आहे. युट्युब कडून कम्युनिटी गाईडलाईन्स उल्लघन झाल्यामुळे युट्युब खाते बंद केल्याचे सांगितले जात असले तरी संसद टिव्हीनं युट्युब खात्यात हस्तक्षेप झाल्याचे सांगत दुरुस्तीची प्रक्रीया युध्दपातळीवर सुरु असल्याचे सांगितलं आहे.




 


संसदेच्या कामकाजाचं लाईव वृत्तांत अलिकडे संसद टिव्ही युट्यूब मार्फत उपलब्ध करुन देण्यात येतं. काल रात्री १ वाजत अज्ञान हॅकर्सनं हे चॅनेल हॅक करुन नाव इथेरीअम असं ठेवलं होतं. त्यानंतर संसद टिव्हीनं प्रयत्नपुर्वक हे अकाऊंट रात्री ३ वाजून ४५ मिनीटापर्यंत रिकव्हर केलं आहे, असं संसद टिव्हीनं म्हटलं आहे.

युट्युबकडून संसदी टिव्ही युट्युब या खात्याला यूट्यूबवर सामुदायिक दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याने ते बंद करण्यात आले आहे असं म्हटलं आहे. संगणक इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) ने ही घटनेची दखल घेतली आहे. यूट्यूबवर संसद टीव्ही वर सध्या 404 एरर उघडत आहे. त्यानंतर एक संदेश लिहिला आहे की हा व्हिडिओ आता यूट्यूबवर उपलब्ध नाही.

Tags:    

Similar News