ईडीच्या कारवाई, संजय राऊत यांचा टोला

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले उद्योजक प्रविण राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली.

Update: 2022-02-03 05:44 GMT

खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले उद्योजक प्रविण राऊत यांना ईडीने अटक केली. त्यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले की, हे 2024 पर्यंत सुरूच राहील.

उद्योजक प्रविण राऊत यांना 1 हजार 34 कोटी रुपयांच्या एचडीआयएलमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी आरोप करण्यात आला होता. त्यामुळे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत हे ईडीच्या रडारवर होते. मात्र मंगळवारी ईडीने छापेमारी करत प्रवीण राऊत यांना ताब्यात घेतले. त्यानंतर प्रवीण राऊत यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. मात्र प्रवीण राऊत यांनी चौकशीला सहकार्य न केल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली. तर प्रवीण राऊत यांच्यावर पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी ईडीने कारवाई केली होती. त्यानंतर आता एचडीएफएल प्रकरणी प्रवीण राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

संजय राऊत यांनी निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांच्या अटकेवर ट्वीटरवरून प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, पहले लालच दिया गया, ऑफर्स दिए | फिर डराया, धमकाया गा | तब भी झुका नहीं तो परीवार तो परिवार को धमकाया गया | हमने कहा छोड दो, नजरअंदाज करो इन्हे, जाने दो | तो अब सेंट्रल एजेंसी को हमारे पीछे लगा दिया | असे म्हणत चलता है 2024 तक चलेगा भी..पर हम झुकेंगे नही, अशी प्रतिक्रीया दिली.

Tags:    

Similar News