"राज्यपालांना हटवा; नाहीतर जोडे काय असतात ते दाखवू" – खा.संजय राऊत

"शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श नेते" राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर खा.संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली. मुख्यमंत्र्यांनी भाजपचा निषेथ केला पाहीजे. तसेच वादग्रस्त वक्तव्य करणे ही भाजपची भूमिका आहे.;

Update: 2022-11-20 08:01 GMT

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यभरातून कोश्यारी यांच्याविरोधात संंतप्त प्रतिक्रियांबरोबरच त्यांचा निषेधही केला जात आहे.शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी देखील कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खा. राऊत म्हणाले,'' मुख्यमंत्री यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान सहन न करता भाजपचा निषेध केला पाहिजे. राज्यपालांना हटवण्याची मागणी केली पाहिजे.

"जर असं झालं नाही तर जोडे काय असतात ही शिवसेना (ठाकरे गट) दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही खा. राऊत यांनी दिला. संजय राऊत पुढे म्हणाले, "राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला आहे. यापूर्वीह भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाजेबची पाच वेळा माफी मागितली होती. असे विधान त्यांनी केले होते. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य करणे ही भाजपची भूमिका आहे,'' असे खा. राऊत म्हणाले. 

त्यामुळे भाजपच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन महाराष्ट्राचे हिंदुत्व धोक्यात येतंय का असा सवाल खा. राऊत यांनी उपस्थित केला. "राज्यपालांनी यापूर्वी युगपुरुष ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती संभाजी राजे यांचा अपमान केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपचे सहयोगी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात विचारवंतांचा, युगपुरुषांचा अपमान पुन्हा व्हायला नको असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी भाजपचा निषेध करणे हे योग्य ठरेल" असे राऊत म्हणाले.

Tags:    

Similar News