ED ने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रीया

Update: 2022-04-05 09:22 GMT

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत ED ने संपत्ती जप्त केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करून प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून संजय राऊय यांची अलिबाग येथील जमीनीवरून प्रश्न उपस्थित केले होते. तसेच संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट या विविध प्रकरणावरून संजय राऊत यांच्यावर मनी लाँडरिंगचे आरोप केले होते. त्यानंतर संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नानंतर संजय राऊत यांची ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. तर आता संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करून प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

Full View


ED ने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करून 'असत्यमेव जयते' अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांची संपत्ती जप्त :ED ने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रीया


ईडीने संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच संजय राऊत यांचा अलिबाग येथील आठ भुखंड जप्त करण्यात आले आहेत. त्याबरोबरच त्यांचा दादर येथील फ्लॅटही जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. तसेच, संजय राऊत आणि त्यांच्या जवळील नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.


Tags:    

Similar News