चमचेगिरी आणि चाटुगिरी करणाऱ्यांना मोदी बोलवतात - संजय राऊत
नव्या संसद भवनाच्या उद्घघाटन सोहळ्यावरून देशात चांगलंच वातावरण तापला आहे. मोदींची चमचेगिरी आणि चाटूगिरी करणाऱ्यांना मोदी कार्यक्रमांमध्ये बोलवतात अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांना दिली.;
दिल्लीमधील नवीन संसद भवनाचे काम म्हणजेच 'सेंट्रल विस्टा' प्रोजेक्ट पूर्ण झाले आहे. संसद भवनांच्या उद्घाटन सोहळा लवकरच पार पडणार असून, याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे. मोदींनी संसद भवन उद्घघाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देखील बोलवलं नाही अशी माहिती संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
पत्रकारांशी संवाद साधतांना राऊतांनी भाजप सरकारची चांगलीच हजेरी घेतली आहे. देशभक्ती आणि लोकशाहीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्यांना, पंतप्रधान या उद्घाटन सोहळ्याला बोलवणार नाही. मोदींची चमचेगिरी आणि चाटुगिरी करणाऱ्यांना पंतप्रधान मोदी बोलवणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच वायरल झालेल्या फोटोचा संदर्भ देत, फडणवीस हे गद्दारांच्या गाड्या चालवत आहेत असा टोला देखील राऊतांनी लगावला आहे.