केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना संजय राऊत यांच्यावर टीका केली. 'संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, त्यांना कुणीतरी चावी देतं आणि मग ते केंद्र सरकार विरोधात टीका करतात. परंतु त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे, आता लोक संजय राऊतांना गांभीर्याने घेत नाहीत.
अशी टीका दानवे यांनी संजय राऊत यांच्यावर केली होती. यावर आज संजय राऊत यांनी दानवे यांना उत्तर दिलं आहे.
"दोन वर्षापूर्वी आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं आणि शिवसेनेला सत्ता मिळाली, आणि भाजपच्या सत्तेला टाळं लागलं, असं सांगताना दानवे यांनी आमच्याकडे चावी आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही उघडू. असं विधान केलं आहे.
दरम्यान आज कोल्हापूरात मराठा मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर रूत यांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.
आज संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले...
कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची क्रांती करणारी भूमी आहे. कोल्हापुरातून मराठा आरक्षणासंदर्भात जी आंदोलनाची सुरुवात झाली आहे .त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या सर्वच घटकांचा सहानुभूती आणि पाठिंबा आहे. या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन प्रधानमंत्र्यांना साकडे घातले आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. अशा प्रकारची प्रमुख भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांकडे मांडली आहे.
मराठा आरक्षणाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे हे सर्व शांतपणे आणि सुरळीत पार पडेल आणि केंद्र सरकार या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढेल अशी आम्हाला खात्री आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.