PM मोदींना टिळकांचं चरित्र वाचायला पाठवणार - संजय राऊत
“सध्याचं राज्यातील सरकार कलंकित आहे देवेंद्र फडणवीस अंगाला काळी हळद लावून बसल्याची टीका सजंय राऊत यांनी केली आहे;
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. परंतु याच पुरस्कारावरुन सध्या वादही निर्माण होत आहेत. पुणे शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यांनतर आता खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
या वर राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की 'नरेंद्र मोदींना टिळकांचं चरित्र वाचायला पाठवीन, ज्यांनी कोणी हा पुरस्कार जाहीर केला आहे त्यांना देखील पाठवीन. टिळकांचा संघर्ष, लोकशाहीविषयीची मतं या सगळ्यांनी समजून घेतली पाहिजेत. पुरस्कार घेणाऱ्यांनी आणि पुरस्कार देणाऱ्यांनी सुद्धा", अशा शब्दांत राऊतांनी मोदींवर टीका केली आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर देखील टीकास्त्र सोडल आहे. संजय राऊत म्हणाले की, “सध्याचं राज्यातील सरकार कलंकित आहे आणि या कलंकीत सरकारमध्ये स्वच्छ, चारित्र्यवान देवेंद्र फडणवीस अंगाला हळद लावून बसले आहे. त्यांनी लावलेली हळद पिवळी नसून काळी आहे. कारण त्यांनी कलंकित हळद लावली आहे.