कुठे आहे विकास? कुठे होते नागपूरचे सुपुत्र? संजय राऊत यांनी केली प्रश्नांची सरबत्ती
Nagpur Floods: नागपूरमध्ये 22 सप्टेंबरला जोरदार पाऊस झाल्याने नागपुर शहर जलमय झालं होतं. चार तासात शहर बुडालं. कुठे आहे विकास? कुठे होते नागपूरचे सुपुत्र? असा सवाल उपस्थित करत शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान संजय राऊत म्हणाले की, नागपुरला आलेला पूर आणि प्रलय नैसर्गिक आपत्ती आहेच. अनेकांची घरे, बंगले पाण्यात गेली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःला नागपूरचे सुपुत्र मानतात. नागपुरात हाहाकार सुरु होता, तेव्हा ते देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर गणपतीचे दर्शन घेण्यात व्यस्त होते. फडणवीस यांच्यावर जेव्हा टीका झाली, तेव्हा ते नागपूरकडे रवाना झाले असल्याचं संजय राऊत म्हणाले. मुंबई सांभाळता येत नाही, असं आम्हाला म्हंटलं जात होत. मात्र, आम्ही ती उत्तमरित्त्या सांभाळली. देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काल ढकललं जात होतं, हे दुर्दैवी चित्र काल महाराष्ट्राने पाहिले असल्याची जोरदार टीका ही राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केली.
यावेळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की "४ तासाच्या पावसात नागपूर बुडालं. कुठे आहे विकास? कुठे होते नागपूरचे सुपुत्र? असा सवाल उपस्थीत करतं नैसर्गिक आपत्ती जरी असली तरी त्यानंतरच्या उपाययोजना करण्यात सरकार अपयशी झाले आहे असल्यांच राऊत म्हणाले. फडणवीस शिवसेना आणि मुंबईवर टीका करतात. मात्र, आता त्यांना अधिकार आहे का? ते पळून गेले. चार तासात शहर बुडाले, हा तुमचा विकास आहे का? असा थेट सवाल राऊत यांनी फडणवीस यांच्यासह भाजपला विचारला आहे.