मणिपूर अस्थिर करण्यामागे चीनचा हात, संजय राऊत यांचं वक्तव्य

Update: 2023-06-29 11:17 GMT
मणिपूर अस्थिर करण्यामागे चीनचा हात, संजय राऊत यांचं वक्तव्य
  • whatsapp icon

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या अस्थिरतेला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही हिंसा थांबलेली नाही. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधी हे मणिपूर दौऱ्यावर गेले आहेत. त्यापुर्वी संजय राऊत यांनी मणिपूर अस्थिर करण्यामागे चीनचा हात असल्याचे वक्तव्य केले.

यावेळी संजय राऊत म्हणाले, मणिपूरच्या जनतेचा सरकारशी संवाद तुटलेला आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी अराजकता माजलेली आहे. सरकारने पलायन केलेला आहे. याचा अर्थ तेथे अराजकता माजलेली आहे. मणिपूर अस्थिर करण्यामागे चीनचा हात असल्याचे स्पष्ट आहे, अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी सर्वपक्षीयांना सोबत घेऊन मणिपूरला जायला हवं. तसेच पेटलेले राज्य शांत करायला हवे. मात्र पंतप्रधान आणि गृहमंत्री यासंदर्भात काहीही बोलत नाहीत. त्यामुळे जर राहुल गांधी हे मणिपूरला जात असतील तर त्यांचे स्वागत करायला हवं, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले होते.

Tags:    

Similar News