विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केल्यामुळे भडकलेल्या आमदारांनी आज कामकाज सुरू होताच गदारोळ करत विधानसभेपाठोपाठ विधान परिषदही बंद पाडली.विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांत चौकशी करुन ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करेन असे अध्यक्ष यांनी जाहीर केले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला अखेर दोन्ही सभागृह दिवसभरासाठी तहकूब झाली.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केले होते. राऊतांच्या त्या वक्तव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) तीव्र पडसाद उमटले. भाजप आणि शिवसेना गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांत चौकशी करुन ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करेन असे अध्यक्ष यांनी जाहीर केले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून सभागृहात गोंधळ सुरुच होता. त्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी महागाईच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली होती .
विधानसभेचे कामकाज सुरू होतात संजय राऊत यांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित राहिला. खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटले. यावरून शिवसेना आणि भाजप आमदार आक्रमक झाले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. या मुद्द्यावरून चार वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
मात्र, या विषयावर सभागृहातील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या उज्वल परंपरेचा अपमान केला आहे. सभागृहाचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे दोन दिवसात चौकशी करून सभागृहात ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करेन असे जाहीर केले. खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधान मंडळाबद्दल (budget session) एक वक्तव्य केलं आहे. ते वक्तव्य काय आहे मी पाहिलेलं नाही. पण सभागृहाबाहेरच्या व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे हे चुकीचे आहेच. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना देशद्रोही संबोधणे हे बरोबर आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केला आहे.
भरत गोगावले यांनी देखील सभागृहात असंसदीय शब्द वापरला आहे. आज भाजपमध्ये अनेक मोकाट सुटलेली माणसं आहेत. आम्ही ह्याला बघून घेतो, त्याला बघून घेतो अशा धमक्या देत आहेत. त्यांचे हे वक्तव्य पुर्वीच्या नेत्यांच्या परंपरेला शोभणारे नाही पण सध्याच्या नेतृत्वाला शोभणारे आहे, अशी टीका भास्कर जाधव यांनी भाजपवर केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधान मंडळाबद्दल एक वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यावर सभागृह वारंवार स्थगित केलं जात होतं. सभागृहात मोठी गोंधळाची परिस्थिती होती. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर हक्कभंग आणावा अशी सत्ताधारी लोकांकडून मागणी केली जात होती. एका ठराविक वेळेनंतर चर्चा होऊन हा विषय थांबावा अशी अपेक्षा होती. पण प्रत्येक गोष्टीचे राजकारण करायचे ही भाजपची परंपरा आहे, असे आमदार भास्कर जाधव म्हणाले.