'एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही': राऊतांची सोमय्यांवर टीका
'एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही' संजय राऊत यांची किरिट सोमय्या यांच्यावर टीका;
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करणाऱ्याभाजप नेते किरीट सोमय्या यांना संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जमीनी व्यवहाराबाबत आरोप केले होते.
उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या नावावरचे २१ सातबारा उताऱ्याचा दाखला देत नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्ये जमिनींचे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या व्यवहारा मागचा अर्थ समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. ठाकरे आणि वायकर जमिनींचे व्यवहार का करत आहेत? महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हे समजावून सांगणार का?, असे सवाल किरीट सोमय्यांनी केला होता.
यावर सोमय्या यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही' अशा शब्दात उत्तर दिलं आहे. काय म्हटलंय राऊत यांनी?
अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगीनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून !
जय महाराष्ट्र