शिंदे गटातील बड्या नेत्याला कोरोनाची लागण, ट्वीट करून दिली माहिती
एकनाथ शिंदे यांच्या गटातील मोठे नेते संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे.;
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील महत्वाचे नेते असलेल्या संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यासंदर्भात संजय राठोड यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
संजय राठोड यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली व ती चाचणी पॉझिटीव्ही आली. लक्षणे नसल्यामुळे डॉक्टरांनी घरीच उपचार घ्यायला सांगितले आहेत. मात्र संपर्कात आलेल्यांना काही त्रास असेल किंवा लक्षणे असतील तर त्यांनी कोरोना चाचणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे.
आज सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली.व ती पॉझिटिव्ह आली.डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे.माझ्या संपर्कात आलेल्याना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती.
— Sanjay Rathod (@SanjayDRathods) August 27, 2022
एकनाथ शिंदे यांचे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर प्रथमच सरकारमधील मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र संजय राठोड यांना लक्षणे नसल्याने त्यांनी घरीच उपचार घेणार असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.
संजय राठोड हे ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री असताना पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरमामुळे चर्चेत आले होते. तर त्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र नव्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्रीपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.