विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही;संघर्ष कामगार संघटनेचा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

Update: 2021-11-13 03:47 GMT

सांगली :  एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आता या आंदोलनाला संघर्ष कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी देखील पाठिंबा दिला आहे. सांगलीत सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देत त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. दरम्यान यावेळी बोलताना राव यांनी म्हटले की, विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही, संप चिरडवण्यापेक्षा सकारात्मक भूमिका घ्यावी, असे राव यांनी म्हटले आहे.

सोबतच गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बस बंद असल्याने प्रवाशांना याचा त्रास होत आहे. मात्र तरी देखील शासन या संपाकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन, राज्य परिवहन महामंडळाचे विलनिकरण करावे. महामंडळाची मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊन, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाचे कर्मचारी म्हणून घोषीत करावे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही लढा मागे घेणार नाहीत, असा इशारा यावेळी राव यांनी दिला आहे.

Tags:    

Similar News