Buldhana Accident Update : समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

Update: 2023-07-01 04:08 GMT

Buldhana Accident Update : समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत देण्याची घोषणा केली.

नागपूरहून पुण्याचे दिशेने निघालेल्या बसला समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या अपघातामध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 8 जण बचावले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली, असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

हे हि पहा...

Full View

Tags:    

Similar News