असा आहे समृद्धीचा दुसरा टप्पा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray ) समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आजपासुन सुरू करण्यात आला आहे. शिर्डी ते भरवीरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचे आज लोकार्पंण करण्यात येणार आहे.
एकूण ८० कि.मी. लांबीच्या या टप्प्याच्या उद्घाटनानंतर आता ७०१ कि.मी पैकी आता ६०० कि.मी लांबीचा समृध्दी महामार्ग काम पूर्ण झालं असून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. त्यातील १०१ कि.मीच काम बाकी आहे. शिर्डी ते भरवीरपर्यंतचे काम पूर्ण झाल्याने आहे. ४५ मिनिटात प्रवास होणार आहे. आज लोकार्पण होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील समृद्धी महामार्गावर खालील सुविधांचा समावेश आहे त्यामध्ये ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग,३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे- ब्रिज असणार आहेत.
भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 किमी अंतराचा असून त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू झाला आहे. तर, उर्वरित टप्प्याचे काम सुरू आहे. त्यापैकी शिर्डी ते भरवीर पर्यंतचे 80 किमी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिर्डी ते भरवीर पर्यंतचा 80 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे. शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटरच्या टप्यात शिर्डी, सिन्नर तालुक्यातील गोंदेगाव तसेच भरवीर अशा तीन इंटरचेंजचा समावेश आहे. त्याचा लाभ कोपरगाव, सिन्नर, नाशिक व इगतपुरी येथे जाणाऱ्या प्रवाशांना प्रामुख्याने होणार आहे. त्याशिवाय या टप्प्यात सात मोठे पूल, 18 छोटे पूल, हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, सहा वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. या दुसऱ्या टप्प्याचा खर्च 3200 कोटी रुपये एवढा आहे.