समृध्दी महामार्गाचे टोल दर आले समोर, पहा प्रति किमी मागे किती रूपये मोजावे लागणार?

Update: 2022-09-16 03:11 GMT

 राज्य सरकारचा गेल्या काही वर्षातील सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई आणि नागपुरला जोडणारा बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग. येत्या काही काळात हा महामार्ग जनतेसाठी खुला होणार असून याचं काम अंतिम टप्प्यात येऊन ठेपलं आहे. अशात नवा महामार्ग म्हटल्यावर टोल हा आलाचं. मुंबई ते नागपुर हे ७०१ किलोमीटरचे अंतर वेगाने पार करण्यासाठी बांधण्यात आलेल्या महामार्गाचे टोल दर किती असणार याबद्दल अनेक जण तर्क वितर्क लावत होते. पण आता या नव्या महामार्गाचे अधिकृत टोल दर आता समोर आले आहेत.

बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग हा बराच चर्चेत रहिला. या महामार्गाच्या नामकरणापासून ते भुसंपादनापर्यंत... या महामार्गावर आता टोल दरांसदर्भातील फलक लावण्यात आला असुन त्याचे फोटोज व्हायरल होऊ लागले आहेत. या फलकावर चार चाकी पासून तो अवजड वाहनांसाठी प्रति किलोमीटर कीती टोल आकारला जाणार आहे या बाबतची माहिती दिली गेली आहे. या फलकावर चार चाकी गाड्य़ांना प्रति किलोमीटर मागे १ रूपया ७३ पैसे अर्थात मुंबई ते नागपुर ७०१ किलोमीटर अंतरासाठी तब्बल १२०० रूपये मोजावे लागणार आहेत. आणि हे दर ३१ मार्च २०२५ पर्यंत म्हणजे फक्त पुढील ३ वर्षांसाठीच असणार आहेत. याशिवाय इतर वाहनांसाठीचे दरही आपण तपशीलवार पाहुयात.

१. मोटर, जीप, व्हॅन अथवा हलकी मोटर वाहने – १.७३ रुपये प्रतिकिलोमीटर

२. हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस – २.७९ रुपये प्रतिकिलोमीटर

३. बस अथवा ट्रक – ५.८५ रुपये प्रतिकिलोमीटर

४. तीन आसांची व्यावसायिक वाहने – ६.३८ रुपये प्रतिकिलोमीटर

५. अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांची वाहने – ९.१८ रुपये प्रतिकिलोमीटर

६. अतिअवजड वाहने (सात किंवा जास्त आसांची) – ११.१७ रुपये प्रतिकिलोमीटर

Tags:    

Similar News