पवार- ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच नवाब मलिकांची वानखेडे कुटुंबीयांवर चिखलफेक- सोमय्या

Update: 2021-10-29 01:28 GMT

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी NCB 1लचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, याप्रकरणातील पंच असलेल्या किरण गोसावीच्या बॉडीगार्डनेही समीर वानखडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. त्यावर्ज भाजप नेत्यांनी समीर वानखेडेंच्या बाजुने राज्य सरकारपुढे प्रश्न उपस्थित केले. त्यातच, आता वानखेडे कुटुंबीयांनी भाजपा नेते किरीट सोमैय्यांची भेट घेतली आहे.  

आर्यन खान ड्रग्जप्रकरण वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचले आहे. एकीकडे आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात झाला आहे. तर, दुसरीकडे वानखेडे विरुद्ध मलिक यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर वानखेडे कुटुंबीय संतप्त झाले असून बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत सर्वच आरोप फेटाळले आहेत. त्यानंतर, आज भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांची भेटही घेतली. समीर वानखेडे यांची पत्नीक्रांती रेडेकर, वडिल ज्ञानदेव वानखेडे आणि बहिणी यास्मीन वानखेडे यांनी किरीट सोमय्यांशी चर्चा केली.

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच नवाब मलिक वानखेडे कुटुंबीयांवर चिखलफेक करत असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच, "शरद पवार यांनी पेड मीडियाचा वापर करून समीर वानखेडे दलित आहेत की मुस्लीम आहेत माध्यमातील चर्चा यावर नेली. परंतु, आम्ही घोटाळेबाजांना सोडणार नाही. आयकर विभागानंतर ईडी चौकशी करत होती." असं किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News