Aryan Khan प्रकरणात समीर वानखेडेंचे चौकशीचे अधिकार काढले, समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
sameer wankhede first reaction after being dropped from the Aryan khan case srk;
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास आज दिल्ली NCB ने आपल्याकडे घेतला. NCB ने या प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेतला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेवर 8 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. वानखेडे यांना हटवल्यानंतर या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.
आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडेंना हटवण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले
"मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी माझी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वय आहे."
एकंदरीत या सगळ्या प्रकरणात आता दिल्ली एनसीबी टीम चौकशी करणार असल्याचं वानखेडे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर वानखेडे मोठ्या वादात सापडले होते. विशेष म्हणजे आर्यन खान खटल्यातील एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर सैल याने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळं त्यांच्या तपासावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
समीर वानखेडे यांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीतून काढून टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांची प्रतिक्रिया आली आहे. आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडेंना हटवण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. एकूण २६ प्रकरणे आहेत ज्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. ही फक्त सुरुवात आहे... ही व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही करू.
असं मलिक यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे.
Sameer Wankhede removed from 5 cases including the Aryan Khan case.
There are 26 cases in all that need to be probed.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 5, 2021
This is just the beginning... a lot more has to be done to clean this system and we will do it.