मराठा आरक्षणाच्या मागणीवर आता संभाजीराजे यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आतापर्यंत मराठा समाजाने शांततेत मूक मोर्चे काढले व जगासमोर आदर्श ठेवला. मात्र एवढे करूनही मराठा समाजाच्या पदरी निराशा पडली आहे. आता मराठा समाज रस्त्यावर उतरायच्या आत मी वेळोवेळी सुचवलेल्या आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या, नाहीतर महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यात छत्तीस मूक मोर्चे होतील असे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकापासून सोळा जूनला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर औरंगाबादसह नाशिक,रायगड,अमरावती,जिल्ह्यात मूक मोर्चाचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गंगापूर तालुक्यातील कायगाव/टोका येथील शहिद काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकाला संभाजीराजे यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.