देशाला म्लेंच्छ, अँग्लो आणि गांधीबाधा झाली, संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य
संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. त्यातच देशाला म्लेंच्छ, अँग्लो आणि गांधीबाधा झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.;
आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या संभाजी भिडे (Sambhaji bhide) यांनी देशाला म्लेंच्छ, अँग्लो आणि गांधीबाधा झाली असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (sambhaji Bhide controversial Statement)
सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण संभाजी भिडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असताना संभाजी भिडे म्हणाले, व्यक्तीच्या जीवनात भुतबाधा होते. खाण्यापिण्यातून विषबाधा होते. परंतू अशा प्रकारच्या बाधा झाल्या तर त्यावर उपाय करता येतो. मात्र देशाला तीन बाधा झाल्या आहेत. त्यात म्लेंच्छ, अँग्लो आणि गांधीबाधा झाली असल्याचे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. (Sambhaji Bhide criticize to congress)
संभाजी भिडे पुढे म्हणाले, या तीन्ही बाधावर उपाय कोणता असेल तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. आपण त्यांची उपासना केली पाहिजे. तसेच त्यांना प्रिय असलेले कार्य पुर्ण करण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रयत्न केला पाहिजे, असे वक्तव्य संभाजी भिडे यांन केली. (Shivaji maharaj and Sambhaji maharaj)
संभाजी भिडे यावेळी बोलताना म्हणाले की, आपला देश हा जगाचा दाता आहे. त्यामुळे देशाची उभारणी करण्यासाठी देशातील 123 कोटी लोकांचा म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांचा रक्तगट झाला पाहिजे. तसेच या देशाच्या भुमीवर हिंदूत्वाच्या स्वातंत्र्याचे कुंकू टिकवायचे असेल तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचारच उपाय ठरू शकतात, असे मत यावेळी संभाजी भिडे यांनी केले.