सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर मध्यप्रदेशात बंदी घालणार: नरोत्तम मिश्रा

सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकामध्ये नक्की असं काय आहे? ज्यावरुन वाद निर्माण झाला आहे. काय आहे वाद? या वादावर कोणी काय म्हटलंय वाचा;

Update: 2021-11-12 11:58 GMT

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या 'सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाइम्स' Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times' या वादग्रस्त पुस्तकावर मध्य प्रदेशात बंदी घालण्यात येणार आहे. राज्याचे गृह आणि कायदा मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

नरोत्तम मिश्रा म्हणाले की, "सोनिया गांधी यांनी विलंब न लावता खुर्शीद यांच्या पुस्तकातील अत्यंत वादग्रस्त उताऱ्यांबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी." ते म्हणाले, खुर्शीद यांचे पुस्तक अत्यंत निषेधार्ह आहे. हे लोक हिंदुत्व तोडण्याची आणि हिंदूंना जातींमध्ये विभागण्याची एकही संधी सोडत नाहीत. तसंच हे लोक देशाचे तुकडे करणारे विचार पुढे नेत आहेत.

कमलनाथही निशाण्यावर दरम्यान, मिश्रा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'नाथ यांनी महान भारताचे वर्णन कुप्रसिद्ध भारत असे केले होते, खुर्शीद यांचे पुस्तक त्याच विचारसरणीला पुढे नेणारे एक पाऊल पुढे टाकणारे आहे.'

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाबाबत स्पष्टपणे सांगितले आहे की, 'हिंदू धर्म ही जीवनपद्धती आहे'. पण आता त्या हिंदुत्वावरही सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मंत्री म्हणाले, "आम्ही कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. त्यांची मतं मिळताच मध्य प्रदेश सरकार राज्यात त्यांच्या पुस्तकावर बंदी घालणार आहे."

माजी केंद्रीय मंत्री खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आईएसआईएस ISIS आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केली आहे. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरही पुस्तकात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आयटी प्रमुख अमित मालवीय यांनी ISIS आणि बोको हरामशी यांच्याशी हिंदुत्वाशी तुलना करणार्‍या पुस्तकाचं पान ट्विट करत खुर्शीद आणि काँग्रेसची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

एवढंच नव्हे तर, या पुस्तकाला विरोध करत विवेक गर्ग नावाच्या वकिलाने खुर्शीद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दिग्विजय, चिदंबरम यांचा संघावर हल्लाबोल दरम्यान, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकाला पाठींबा दिला आहे. दिग्विजय सिंह म्हणाले, 'हिंदुत्व या शब्दाचा हिंदू धर्म आणि सनातनी परंपरांशी काहीही संबंध नाही.'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर तोंडसुख घेत ते म्हणाले, "देशात हिंदू धोक्यात नाही, मात्र, फूट पाडा आणि राज्य करा ही मानसिकता धोक्यात आहे. या देशाच्या संपूर्ण इतिहासात, भारतात इस्लामच्या आगमनापूर्वीच धार्मिक कारणास्तव मंदिरे नष्ट केली गेली आहेत. जेव्हा एखाद्या राजाने दुसऱ्या राजाचा प्रदेश जिंकला तेव्हा त्याने त्या राजाच्या धर्मापेक्षा आपल्या धर्माला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता इस्लाम आगमनाने मंदिरे पाडण्यास सुरुवात झाली. असं सांगितलं जात आहे." असं दिग्विजय सिंह यांनी केलं आहे.

राममंदिराला बनवलं मुद्दा... रामजन्मभूमी वाद हा नवीन नाही. मात्र, विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसने याला कधीच मुद्दा बनवले नव्हते. मात्र, 1984 मध्ये भाजपच्या दोन जागा कमी झाल्या तेव्हा यांनी हा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला. चिदंबरम म्हणाले, "आज आपण अशा देशात राहत आहोत. जिथे पंतप्रधान आणि गृहमंत्री लिंचिंगचा निषेध करत नाहीत" दरम्यान, अयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला संकुचित कायदेशीर आधार देणारा निर्णय आहे. असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Tags:    

Similar News