दुःखद बातमी : प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीनाथ फडके यांचं निधन

Update: 2024-02-21 11:33 GMT

Panvel : महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांचं निधन २१ फेब्रुवारी रोजी पनवेलच्या विहीघर येथे झालं. फडकेंच्या निधनाने महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पनवेल तालुक्यातील विहिघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध झाले होते. वडिलांमुळे पंढरीनाथ फडके यांना बैलगाडीचा नाद लागला होता. आत्तापर्यंत ४० ते ५० शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवले होते.

कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरीशेठ यांची नजर असायची. त्यानंतर त्याची कितीही किंमत असली तरी ते विकत घ्यायचे. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल ११ लाख रुपयांची शर्यत जिंकली होती. आज २१ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झालं.

Tags:    

Similar News