उर्दूत साहित्यात 'आई' वर गजल लिहिणारे शायर ; मुनव्वर राणा यांचे दुःखद निधन

उर्दू चे बेहतरीन शायर मुनव्वर राणा यांचे, रायबरेली, उत्तर प्रदेश येथे 71 व्या वर्षी हृदय विकाराने दुःखद निधन झाले;

Update: 2024-01-15 01:08 GMT

मुन्नवर राणा , यांचे उर्दू शायरी मध्ये विशेष स्थान असून ते एक प्रयोगशील शायर म्हणून ओळखले जातात. गजल ही उर्दू मधील मुख्यत: प्रेयसी संदर्भात असते, प्रेयसीला आपल्या भावना सांगणे किंवा आपली प्रेमातील अवस्था प्रकट करणे असते. पुढे देव आणि सामाजिक प्रश्नावर देखील गजल आल्या. मात्र आईला गजल मध्ये आणणे आणि आईच्या संदर्भात गजल लिहिण्याचे काम मुन्नवर राणा यानी केले आणि त्यामुळे ते केवळ भारतातच नव्हे तर विदेशात देखील खुप प्रसिद्ध पावले

त्यांच्या गजल मधील आई संदर्भातील अनेक शेर प्रसिद्ध आहेत, त्यांचा आई संदर्भात असणारा शेर प्रचंड लोकप्रिय आहे




 


किसी को घर मिला हिस्से में या कोई दुकाँ आई

मैं घर में सब से छोटा था मिरे हिस्से में माँ आई

- मुन्नवर राणा

किंवा

ये अंधेरे, देख तेरा मुहं काला हो गया,

मेरी माँ ने आँख खोली

और मेरे घर में उजाला हो गया




 


इतर ही विषयावर त्यांनी अनेक गजल लिहिल्या ज्याचे देखील शेर खूप लोकप्रिय आहे त्यापैकी

कामगार वर्गाच्या संदर्भातील हा शेर मला जसा आवडतो, तसा तो अनेकांना ही आवडत असेल



कही भी अखबार बिछाकर सो जाते है!

मजदूर निंद के लिये गोलिया नही खाते

-मुन्नवर राणा




 


मुन्नवर राणा यांना 2014 साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मुन्नवर राणा हे सदैव विवादात रहात आले आहे. 2022 मध्ये त्यांनी हिंदू - मुस्लिम दंग्यानंतर प्रतिक्रिया दिली होती की, "यावेळी योगी आदित्यनाथ निवडून आले तर मी उत्तर प्रदेश सोडून कलकत्ता येथे रहाण्यास जाईल"

मुन्नवर राणा यांची मुलगी सुमैय्या राणा ही समाजवादी पक्षा तर्फे राजकारणात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या निधनाची बातमी आल्यावर देखील ते भावूक झाले होते. गेली 3/4 वर्षा पासून आजारी असणाऱ्या राणा यांची काही दिवसांच्या पूर्वी जास्त बिघडली आणि आज रविवारी रात्री त्यांचे दुःखद निधन झाले.

साहित्य आणि कवितेच्या क्षेत्रातील या दिग्गज शायराला मॅक्स महाराष्ट्र तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली



Tags:    

Similar News