सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

Update: 2021-03-27 05:59 GMT

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात सचिनने ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्याला कोरोनाची सौम्य लक्षण असल्याचं सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सचिनच्या घरातील इतर सर्व व्यक्तींच्या टेस्ट निगेटीव्ह आल्याचे सचिनने म्हटलं आहेत सचिन घरामध्येच होम क्वारंन्टाईन राहणार आहे. असं सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. २६ मार्चला राज्यात ३६ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. तर ११२ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Tags:    

Similar News