शेतकरी आंदोलनालावरून कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केल्यानंतर आज कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी भाजप आणि RSS चं नाव न घेता निशाणा साधला आहे.
काय म्हटलंय सचिन पायलट यांनी...
"जर तुम्ही शेतकऱ्याच्या कल्याणाची भाषा करत असाल तर तो खरा राष्ट्रवाद आहे. नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नाही... जे शेतकरी आपल्या हक्कांसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत त्यांना नक्षलवादी, माओवादी, विभाजनवादी आणि दहशतवादी संबोधलं जात आहे शेतकऱ्यांचा एकही नेता केंद्र सरकारमध्ये नाही, असं म्हणत त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला.
जो शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत विचार करेल. जर शेतकऱ्यांसोबत उभं राहणं हे राजकारण असेल तर आम्ही ते करत आहोत. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे आणि कायम पाठिंबा राहिल. असं म्हणत सरकारने कायदे तात्काळ मागे घेण्याची मागणी सचिन पायलट यांनी केली आहे.