सचिन, हरभजन सिंह मोबाईलमध्ये व्यस्त, झाला ट्रेनचा अपघात

Update: 2023-09-28 09:32 GMT

मोबाईलच्या वाढत्या वापराचा जसा फायदा आहे तसाच त्याचा तोटाही आहे. माहिती संकलन आणि तात्काळ संवादासाठी मोबाईल फोन उपयुक्त ठरतो. मात्र, मोबाईल फोनच्या अतिवापरामुळं मानसिक आणि शारिरिक आजारांची संख्याही वाढतेय. उत्तर प्रदेशातील मथुरा रेल्वे स्टेशनवर मोबाईलमुळं रेल्वेचा अपघात झालाय.

शकुर बस्ती ईएमयू ही रेल्वे २७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी मथुरा रेल्वे स्टेशनवर आली. ही शटल रेल्वे असल्यानं सर्व प्रवासी या रेल्वे स्टेशनवर उतरले. त्यानंतर रेल्वे याच ठिकाणी बंद करून उभी करायची होती. मात्र, यावेळी ट्रेनचा चालक (लोको पायलट) गोविंद बिहारी शर्मा याला ट्रेन थांबविण्यासाठी ब्रेक दाबायचा होता, मात्र, मोबाईलमध्ये व्यस्त असलेला लोका पायलट शर्मा हा दारूच्या नशेत असल्यानं त्यानं ब्रेक ऐवजी एक्सिलेटर दाबल्यानं रेल्वे वेगानं प्लेटफॉर्मवर चढली. सुदैवानं त्यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही.

दरम्यान, रेल्वे प्रशासनानं लोको पायलट गोविंद शर्मा, तांत्रिक विभागातील हरभजन सिंह, सचिन, बृजेश कुमार व कुलदीप यांना निलंबित केलंय. निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी होती की, या रेल्वेला स्टेशनवर थांबवणं. मात्र, निलंबित करण्यात आलेले कर्मचारी हे नशेत असल्याचं निष्पन्न झालंय.

Tags:    

Similar News