सामना वाचल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल : संजय राऊत
भाजप नेते चंद्रकांत पाटील हे रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत या चंद्रकांतदादांच्या विधानाची शिवसेना नेते संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. ‘बापरे, चंद्रकांतदादा पत्रं लिहिणार आहेत. याची मला भीती वाटतेय, त्यांनी तात्काळ पत्रं लिहावं,’ असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.;
चंद्रकांत पाटील 'सामना' वाचतात ही चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत ते 'सामना' वाचत नव्हते आता वाचायला लागले. त्यांनी 'सामना' रोज वाचला पाहिजे हे चांगलं आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल. रोज पेपर वाचत राहिले तर आघाडी सरकार पाच वर्षे कायम राहणार असल्याचा विश्वासही त्यांच्या मनात निर्माण होईल.
औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसने विरोध केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शहराच्या नावावर काही मतभेद असूच शकत नाही. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांची औरंगजेबापेक्षा संभाजी महाराजांवरच जास्त श्रद्धा असणार यात शंका नाही, असं राऊत म्हणाले. बाबर आपला कोणीच लागत नाही. पण प्रत्येक हिंदुंची संभाजी महाराजांवर श्रद्धा आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले.