Russia Ukraine war : युक्रेनने नाटोला सुनावले

रशिया आणि युक्रेन युध्द दहाव्या दिवशीही सुरुच आहे. या युध्दात नाटो देशांनी युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेन्स्की यांनी नाटो या संघटनेला चांगलेच सुनावले आहे.

Update: 2022-03-05 06:13 GMT

रशिया युक्रेन युध्द दहाव्या दिवशीही सुरु आहे. या युध्दात रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरु आहेत. मात्र दहा दिवसानंतरही रशियाला युक्रेनची राजधानी कीव्ह ताब्यात घेण्यात यश आले नाही. त्यापार्श्वभुमीवर नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेन्स्की यांनी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनवर कडाडून टीका केली.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, रशियाचे हल्ले सुरु असून त्यात सामान्य लोकांचा मृत्यू होत आहे. हे माहित असूनही नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिला. त्यावरून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेन्स्की यांनी नाटोवर सडकून टीका केली.

झेलेन्स्की म्हणाले, नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार देऊन एक प्रकारे रशियाला युक्रेनमधील शहरांवर हल्ले करण्यासाठी ग्रीन सिग्नलच दिला आहे. त्याबरोबरच पाश्चिमात्य देशांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युध्द न थांबवल्यास त्यांच्यावर ककठओर निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे.

नाटोने म्हटले आहे की, युक्रेनमध्ये लष्करी आघाडीसह नो फ्लाय झोन लागू करता येणार नाही. अन्यथा या निर्णयामुळे युरोपात मोठे युध्द होऊ शकते. त्यात अनेक देश सामील होऊन गंभीर परीणाम होऊ शकतात. त्यामुळे युक्रेनला नो फ्लाय झोन करण्यात आला नाही, असे मत नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी व्यक्त केले.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु झालेल्या संघर्षादरम्यान युक्रेनला रशियाविरोधात लष्करी मदत पुरवण्याचे आश्वासन नाटोने दिले होते. मात्र रशियाने युक्रेनविरोधात युध्दाची घोषणा केल्यानंतर नाटोने युक्रेनला थेट लष्करी मदत देण्याचे नाकारले. त्यामुळे युक्रेन नाटोवर नाराज असतानाच त्यापाठोपाठ नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेन्स्की यांनी नाटोवर सडकून टीका केली आहे.

Tags:    

Similar News