कोरोना नियंत्रणासाठी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची नॉन वर्किंग विकची घोषणा

Update: 2021-10-21 16:18 GMT

रशियात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नॉन वर्किंग विकची घोषणा केली आहे. सर्व कामगारांना पगारी रजा देण्यात येणार आहे. सोबतच नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी, 28 ऑक्टोबरपासून राजधानी मॉस्कोमध्ये आठवडाभर राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर केला आहे.

दरम्यान, मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोब्यानिन यांनी म्हटले आहे की,या काळात सर्व दुकाने, बार आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद राहतील. सुपरमार्केट आणि फार्मसी सारख्या अत्यावश्यक दुकानांनाच खुले राहण्याची परवानगी असेल.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार नॉन वर्किंग विकचा प्रस्ताव दिला आहे. रशियामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 1,028 लोकांचा मृत्यू झाला. एका दिवसात मृत्यू हा सर्वात मोठा आकडा आहे.रशियामध्ये साथीच्या आजाराने मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 226,353 झाली आहे, जी युरोपातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

Tags:    

Similar News