UK Prime Minister : भारतीय वंशाचे ऋषी सुनक थेट ब्रिटनचे पंतप्रधान

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनले. पण ऋषी सुनक नेमके आहेत तरी कोण? जाणून घेण्यासाठी वाचा...

Update: 2022-10-24 16:01 GMT

लिझ ट्रस (Liz Truss) यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत.

बोरीस जॉन्सन (Borris Johnson) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर लिझ ट्रस (Liz Truss) आणि ऋषी सुनक (Rushi Sunak) यांच्यात पंतप्रधान पदासाठी लढत झाली होती. यामध्ये लिझ ट्रस यांनी विजय मिळवला होता. मात्र अवघ्या 45 दिवसात लिझ ट्रस (Liz Truss Resign) यांनी राजीनामा दिला. त्यामुळे पुन्हा एकदा ब्रिटनच्या पंतप्रधान पदी कुणाची वर्णी लागणार याविषयी चर्चा सुरु झाली. यामध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी बाजी मारत ब्रिटनचे पंतप्रधान पद पटकावले. (UK prime minister Rushi Sunak)

भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवारी सत्तारुढ कंझर्व्हेटिव्ह (Conservative party) पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. दरम्यान ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही ही पंतप्रधान पदाची निवडणूक लढवण्यासाठी योग्य वेळ नसल्याचे म्हणत माघार घेतली. याबरोबरच पेनी मार्डंट (Peny mardant) यांना 100 सदस्यांचा पाठींबा मिळवता आला नाही. त्यामुळे ऋषी सुनक यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. त्यातच सोमवारी सुनक यांच्या पंतप्रधान पदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 180 सदस्यांनी सुनक यांना पाठींबा दिला. त्यामुळे ऋषी सुनक हे विजयी झाले. मात्र यानंतर बंकिंघम पॅलेसमध्ये महाराजा चार्ल्स (king Charls Third) तृतियची भेट घेतल्यानंतर सुनक हे पंतप्रधान कार्यालय 10, डाऊनिंग स्ट्रीट कार्यालयात पदभार स्वीकारतील.

ऋषी सुनक ब्रिटनचे पहिले कृष्णवर्णीय पंतप्रधान

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले कृष्णवर्णीय पंतप्रधान बनले आहेत. तसेच ते ब्रिटनचे पहिले हिंदूधर्मीय पंतप्रधान ठरले आहेत.

सुनक यांचा ट्रस यांनी केला होता पराभव

बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी लढत झाली. यामध्ये लिझ ट्रस यांना सत्तारुढ पक्षाच्या सदस्यांनी पाठींबा दिल्याने सुनक यांचा पराभव झाला. मात्र अवघ्या 45 दिवसात ट्रस यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सुनक यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली.

कोण आहेत ऋषी सुनक? (Who is Rushi Sunak)

ऋषी सुनक यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला असला तरी त्यांचे वडील डॉ. यशवीर आणि त्यांची आई उषा सुनक या भारतीय आहेत. तसेच ऋषी सुनक हे इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मुर्ती आणि सुधा मुर्ती यांचे जावई आहेत.

c

Tags:    

Similar News