ऋषी सुनक ठरत आहे बेस्ट सेलर, पाच दिवसात तिसरी आवृत्ती

Rushi Sunak Book : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहीलेलं पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या पुस्तकाची पाच दिवसात तिसरी आवृत्ती सुरु करण्यात आली आहे.;

Update: 2023-05-09 05:46 GMT

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Bri यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये 2000 प्रतींची तिसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या पुस्तकासाठी दिगंबर दराडे यांनी लंडन येथे जाऊन ऋषी सुनक यांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलू उलगडले. या पुस्तकाला युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. तर ज्या देशाने भारतावर दीडशे वर्ष राज्य केले. त्या ब्रिटनचे पंतप्रधान हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांच्या कामामुळे भारतीयांना अभिमान वाटेल, असं या पुस्तकाचे लेखक दिगंबर दराडे यांनी म्हटले आहे. तसेच या पुस्तकाबद्दल माय मिररचे मनोज अंबिके म्हणाले, ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत असून आठ दिवसांमध्ये आम्ही तिसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याचाही आमचा संकल्प आहे.

या पुस्तकावर ऋषी सुनक यांनी प्रतिक्रीया देतांना म्हटले आहे की, मी ब्रिटिश नागरिक आहे. येथे माझे घर आहे. हा माझा देश आहे. परंतु माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी एक हिंदू आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे.


Tags:    

Similar News