10 वर्षात मुंबईत 48 हजार 434 घटना, माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड
RTI reveals Mumbai reports fire incidents almost every day;
मुंबईत गगनचुंबी इमारतीचे जाळे पसरले आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. परंतु मुंबई अपघाताचे शहर बनले आहे. कारण दहा वर्षात मुंबईत तब्बल 48,434 आग लागण्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलांला दिलेल्या माहितीत ही माहिती समोर आली आहे..
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे 2008 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती आग लागल्याच्या घटना घडल्या? तसेच किती गगनचुंबी इमारतात/ रहिवाशी इमारतीत / व्यावसायिक इमारतीत आणि झोपड्यात आग लागली आहे. व कोणत्या कारणामुळे आग लागली आहे. तसंच या आगीच्या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे? तसेच किती रुपयांच्या मालमत्तेच्या नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात मुंबई अग्निशमन दलाचे जनमाहिती अधिकारी तथा विभागीय अग्निशमन अधिकारी एस.डी. सावंत यांनी शकील अहमद शेख यांस माहिती अधिकार अधिनियम-2005 अन्वये माहिती दिलेली आहे.
या माहितीप्रमाणे सन 2008 पासून जुलै 2018 पर्यंत एकूण 48,434 आग लागण्याच्या दुर्घटना झाल्या आहे. त्यात 1,568 गगनचुंबी इमारतीत आग लागली आहे. तसेच 8,737 रहिवाशी इमारतीत आग लागली आहे. तसेच 3,833 व्यासायिक इमारतीत आग लागली आहे. आणि 3,151 झोपडपट्यांमध्ये आग लागली आहे.
सर्वात जास्त आग लागल्याचे कारण शॉर्टसर्किट असल्याचं माहितीवरुन दिसून आलं आहे. तब्बल 32,516 ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. व तब्बल 1,116 आगीच्या घटना गॅस सिलिंडर लिकेजमुळे लागल्या आहेत. तब्बल 11889 आग अन्य कारणामुळे लागल्या आहेत. तसेच एकूण 609 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 212 पुरुष व 212 स्त्री आणि 29 मुलांचा समावेश आहे. तसेच आगीच्या घटनेत 89,04,86102/- रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
तसेच परिमंडळ-I चे हद्दीत एकूण 9887 आग लागल्या असून त्यात 325 गगनचुंबी इमारत, 1546 रहिवाशी इमारत, 987 व्यावसायिक इमारत आणि 75 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे. तसेच परिमंडळ-II चे हद्दीत सर्वात जास्त एकूण 10719 आग लागली असून त्यात 129 गगनचुंबी इमारत, 1824 रहिवाशी इमारत, 664 व्यावसायिक इमारत आणि 934 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे.
तसेच परिमंडळ-III चे हद्दीत एकूण 8717 आग लागली असून त्यात 496 गगनचुंबी इमारत, 1382 रहिवाशी इमारत, 939 व्यावसायिक इमारत आणि 443 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे. तसेच परिमंडळ-IV चे हद्दीत एकूण 8328 आग लागली असून त्यात 289 गगनचुंबी इमारत, 1835 रहिवाशी इमारत, 661 व्यावसायिक इमारत आणि 403 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे. तसेच परिमंडळ-V चे हद्दीत एकूण 5683 आग लागली असून त्यात 50 गगनचुंबी इमारत, 1547 रहिवाशी इमारत, 208 व्यावसायिक इमारत आणि 1273 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे. तसेच परिमंडळ-VI चे हद्दीत एकूण 5107 आग लागली असून त्यात 279 गगनचुंबी इमारत, 603 रहिवाशी इमारत, 374 व्यावसायिक इमारत आणि 23 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे.
सर्वात जास्त गगनचुंबी इमारतीत परिमंडळ-III च्या हद्दीत एकूण 496 आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त रहिवाशी इमारतीत परिमंडळ-IV च्या हद्दीत 1835 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त व्यावसायिक इमारतीत परिमंडळ-I च्या हद्दीत 987 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त झोपड्यात परिमंडळ-V च्या हद्दीत 1273 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त एकूण 177 लोकांचा बळी परिमंडळ-I च्या हद्दीत झाला आहे. तसेच सर्वात जास्त आगीच्या घटनेत नुकसान एकूण 394809686/- इतके रुपयांच्या नुकसान झाले आहे.
तसेच वर्ष 2020 मध्ये एकूण 3841 आगीच्या अपघातात 100 जणांचा मृत्यू व 298 जखमी झाले आहे
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन दल अधिकारी महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम -2006 च्या अंमलबजावणी का करत नाही ? अजूनही अशा प्रकारे आग लागण्याच्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी मुंबई मनपा आयुक्त आणि मुख्य अग्निशमन अधिकारी यांना पत्र पाठवून महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनिय-2006 च्या अमलबजावणी करण्याचे मागणी केली आहे.
शकील अहमद शेख
आरटीआय कार्यकर्ते