सरसंघचालकांच्या भाषणातून मोदींचे अपयश स्पष्ट : संजय राऊत

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-10-15 08:08 GMT
सरसंघचालकांच्या भाषणातून मोदींचे अपयश स्पष्ट : संजय राऊत
  • whatsapp icon

सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसऱ्यानिमित्त केलेले भाषण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपयशाचा पुरावा आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जे मुद्दे देशासमोर ठेवले आहेत त्यात अंमली पदार्थांच्या वापराचा मुद्दा महत्त्वाचा आहे. अंमली पदार्थांमधील पैसा जर देशविघातक कारवायांसाठी वापरला जात असेल तर केंद्र सरकार काय करत आहे, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. नोटाबंदीनंतरही जर देशविघातक कारवाया बंद होत नसतील तर हा चिंतेचा विषय आहे,असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. देशात प्रखर राष्ट्रवादी, हिंदूवादी सरकार आहे तरी जर अशा कारवाया होत असतील तर हा चिंतेचा विषय असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.


Full View

Tags:    

Similar News