RSS ची काळी टोपी हा न्यू इंडियातील पत्रकारांसाठी नवा ड्रेस आहे का?, काँग्रेसचा सवाल

कर्नाटकातील मकर संक्रातीच्या कार्यक्रमासाठी पत्रकारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा युनिफॉर्म नसल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारला होता. त्यावरून काँग्रेसने RSS ची काळी टोपी हा पत्रकारांसाठी न्यू इंडियातील पत्रकारांसाठी नवा ड्रेस आहे का? असा सवाल केला आहे.;

Update: 2022-01-15 09:50 GMT

कर्नाटकातील कलबुर्गी येथे RSS चा वार्षिक मकर संक्रांती उत्सव आयोजित केला होता. तर या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाचे वृत्तांकण करण्यासाठी गेलेल्या तीन पत्रकारांना आरएसएसचा युनिफॉर्म नसल्याचे कारण देत प्रवेश नाकारला, असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

आरएसएसचे स्वयंसेवक हे काळ्या रंगाची टोपी, पांढरा शर्ट, खाकी पॅंट यासह ब्राऊन रंगाचे सॉक्स आणि काळ्या रंगाचे बुट या प्रकारचा युनिफॉर्म वापरतात. तर आरएसएसच्या मकर संक्रातीच्या वार्षिक उत्सवाला हा युनिफॉर्म स्वयंसेवकांना सक्तीचा होता. मात्र त्या कार्यक्रमाचे वृत्तांकण करण्यासाठी गेलेल्या vernacular daily च्या दोन पत्रकार आणि फोटोग्राफरला गणवेश नसल्यामुळे कार्यक्रमासाठी प्रवेश नाकारला. त्यावरून प्रवेश नाकारलेले पत्रकार म्हणाले की, ते पत्रकारांनी गणवेश घालण्याची अपेक्षा कशी करू शकतात.

यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर प्रांत बौधिक प्रमुख कृष्णा जोशी यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, माध्यम प्रतिनिधींना कोणतेही अधिकृत आमंत्रण पाठवले नव्हते. तर हा कार्यक्रम स्थानिकांसाठी होता. त्यामुळे ज्यांनी गणवेश घातला नव्हता त्यांना परत पाठवले गेले. त्यामुळे गणवेशात नसलेल्या पत्रकारांना परत पाठवण्यात आले, अशी माहिती जोशी यांनी दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कलबुर्गीचे प्रचारक विजय महतेश म्हणाले की, ज्या पत्रकारांना संघाचा मकर संक्रांती उत्सवाचे वृत्तांकण करायचे असेल त्यांना गणवेशाची सक्ती करण्यात आली आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

पत्रकारांना संघाच्या कार्यक्रमात गणवेशावरून प्रवेश नाकारल्याच्या घटनेवर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले की, RSS ची काळी टोपी हा पत्रकारांसाठी नवा ड्रेस आहे. हा न्यू इंडिया आहे, अशा शब्दात मोदी सरकारला टोला लगावला.

Tags:    

Similar News