शरद पोंक्षेच्या नावाला आरपीआय खरात गटाचा विरोध
राज्यपाल नियुक्त १२ जागांवरील सदस्यांसाठी शिवसेनेकडून शरद पोक्षे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यातच शरद पोंक्षे यांच्या नावाला आरपीआय खरात गटाने विरोध केला आहे. अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या शरद पोंक्षे यांना महाविकासआघाडी कडून उमेदवारी देऊ नये अशी विनंती आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांनी केली आहे.