IPL च्या धर्तीवर MPL चा थरार, MCA अध्यक्ष रोहित पवार यांची घोषणा

सध्या IPL चा थरार सुरु आहे. त्यामुळे यंदाचा सीजन कोण जिंकणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना MCA चे अध्यक्ष रोहित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.;

Update: 2023-05-23 03:40 GMT

राज्यात IPL च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रिमियर लीग (MPL) सुरु करण्याची घोषणा MCA चे अध्यक्ष रोहित पवार (Rohit pawar) यांनी केली आहे. त्यामुळे 15 ते 29 जून दरम्यान पुण्यातील गहूंजे (Gahunje Stadium) येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) मैदानावर होणार आहे. या MPL च्या स्पर्धेत केदार जाधव (Kedar Jadhav), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांच्यासह सुमारे 100 अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असणार आहे.

MPL लिलावासाठी राज्यभरातून खेळाडूंची नोंदणी

MPL साठी अ, ब आणि क श्रेणीतील खेळाडूंचे लिलाव होतील. यामध्ये प्रत्येक संघात 19 वर्षाखालील दोन खेळाडू घेणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात MPL स्पर्धेसाठी खेळाडूंचे लिलाव होतील. मात्र यासाठी राज्यभरातून लिलावासाठी अहमदनगर, बीड, धुळे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सोलापूर, बुलढाणा, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून 200 पेक्षा अधिक खेळाडूंनी नाव नोंदणी केल्याची माहितीही यावेळी पवार यांनी दिली.

याच स्पर्धेदरम्यान महिलांच्या तीन संघांमध्ये प्रायोगिक तत्वावर MPL घेण्यात येईल, असंही रोहित पवार यांनी सांगितले.

विजेत्यांना नेमकं काय मिळणार?

MPL T-20 2023 साठी विजेत्या संघाला 50 लाख रुपयांचे पारितोषक देऊन संघाचा गौरव करण्यात येईल. त्याबरोबरच उपविजेत्या संघाला 25 लाख देण्यात येईल. त्याबरोबरच वैयक्तिक पातळीवर उल्लेखनिय खेळ करणाऱ्या खेळाडूंवरही बक्षिसांचा वर्षाव करण्यात येईल.

या MPL मध्ये 8 पुरुष तर 3 महिला संघांचा सामना होणार असल्याची माहिती MCA चे अध्यक्ष रोहित पवार यांनी दिली.

Tags:    

Similar News