रस्त्यावरचा खड्डा भरता येतो, माणसाचं आयुष्य भरता येत नाही - राज ठाकरे यांचा सरकारवर निशाणा
रस्त्यावरचा खड्डा भरता येतो, माणसाचं आयुष्य भरता येत नाही - राज ठाकरे यांचा सरकारवर निशाणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई- गोवा महामार्गाच्या मुद्दयावर मनसे आक्रमक झालीय. वर्षांनुवर्षे रस्ता का होत नाही. रस्त्यावरचा खड्डा भरता येतो, माणसाचं आयुष्य भरता येत नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुंबई- गोवा महामार्गावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांची केली कानउघडणी केली. "चंद्रयानाच्या खर्चा पेक्षा कोकण महामार्गाच्या रस्त्यावरच खर्च जास्त झालाय. खड्डेच पहायचे होते तर तेच यान कोकणात उतरावायच होतं, असा टोमणाही राज यांनी यावेळी लगावला. दरम्यान या रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गासाठी मनसेच्या वतीने जागर यात्रा आज पहाटे पासून काढण्यात आली. यातच कोकणातील कोलाड येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत राज ठाकरे बोलत होते.
ते म्हणाले , " हा रस्ता असा का आहे ? यावरच असे खड्डे का आहेत ? १७ वर्ष झाली. हा रस्ता का होत नाही. सरकारला धारेवर धरतांना राज ठाकरे म्हणाले की." सरकारला जाग यावी म्हणून तुम्ही सगळ्यांनी पदयात्रा केली. पद यात्रा हा सभ्य मार्ग असतो. आपल्या पक्षाचं तसंच धोरण आहे. पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून बोलायचं असतं, असंही राज यावेळी म्हणाले.
" ज्या - ज्या महाराष्ट्र सौनिकांनी आणि कोकणी बांधवांनी पदयात्रेत सहभाग नोंदवला. त्यांचे मी आभार मानतो. अमित आणि पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी परिश्रम घेतले आहेत. कोकणी बांधवांना व भगिनींना मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांवरील खड्डे सहन करावे लागत आहेत. याचा राग कसा येत नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.
हा रस्ता असा ठेवण्यामागे सगळयात महत्त्वाचं कारण कोकणी बांधवांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. ज्यावेळी रस्ता होईल तेव्हा शंभर पट भावाने व्यापाऱ्यांना जमिनी विकल्या जातील. तुम्हाला काहीही मिळणार नाही. रस्ता चांगला झाल्यानंतर आजुबाजूच्या जमिनींचे भाव काय होतात ? हे समजून घ्या. जमिनी विकू नका. तशाच ठेवा पुढे तुम्हाला फायदा होईल, असा सल्लाही राज यांनी यावेळी स्थानिकांना दिला.