सुरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणारे आठ ते दहा ट्रक नागरिकांनी पेटविले. आज दुपारी या ट्रकच्या झालेल्या अपघातात एक महिला मृत्युमुखी पडली होती. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील नागरिकांनी या वाहतुकीला विरोध केलेला होता. काही दिवसापूर्वी शहरातील वाहतूक समस्येमुळे यासाठी पर्यायी रस्ता करावा या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी बंद पुकारला होता. यापूर्वी देखील एटापल्ली येथे लोह खनिज वाहतुकीचे ट्रक पेटवून देण्याची घटना घडलेली होती.
काय आहे नागरिकांचे म्हणणे.
या भागातील रस्त्यांची दुरावस्था आहे. ट्रक वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी तयार होते. ट्रकच्या टायरला चिकटून आलेला चिखल रस्त्यावर जमा होतो. यामुळे बऱ्याचदा अपघात होतात. यासाठी या वाहतुकीला येथील नागरिकांचा विरोध आहे.
तात्कालिक कारण काय ?
सुभाष जयदार यांच्या पत्नी बिजोली राहणार कांचानपुर यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. या संतापातून शांतिग्राम येथे नागरिकांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.