राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ: एका दिवसात 11 हजार 141 बधित
राज्यात दुसऱ्या लाटेचा कोरोनाचा संसर्ग वाढतच असून सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या दहा हजाराच्या पार झाली आहे. राज्यात आज 6013 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.17 टक्के असून आतापर्यत एकूण संख्या 20 लाख 68 हजार 044 झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 11,141 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 97,983 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1,88,67,286 नमुन्यांपैकी 22 लाख 19 हजार 727 नमुने पॉझिटिव्ह (13.16 टक्के) आले आहेत. राज्यात 4 लाख 39 हजार 055 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 4 हजार 650 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज 38 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.36 टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले 38 मृत्यूपैकी 30 मृत्यू हे मागील 48 तासातील असून पाच मृत्यू मागील आठवड्यातील असून उर्वरीत 3 मृत्यू आठवड्यापूर्वीचे आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आजा कोरोना सादरीकरण झाले त्यामधे राज्यात 52 लाख 18 हजार 840 लस मिळाल्या असून 2 लाख 49,954 लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
राज्य एकूण: बाधीत रुग्ण-(22,19,727), बरे झालेले रुग्ण-(20,68,044), मृत्यू- (52,478), ॲक्टीव्ह रुग्ण-(97,983)