न्यायालयाच्या निर्णयावर मत व्यक्त करणं ही आपली परंपरा नाही: संजय राऊत

Update: 2020-11-27 11:52 GMT

अभिनेत्री कंगना रानावतच्या बांद्र्यातील कार्यालयाच्या पाडकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत हायकोर्टाने बीएमसीने पाठवलेली नोटीसही अवैध ठरवली आहे. योग्य वेळी सगळ्यांची उत्तर मिळतील, न्यायालयाच्या निर्णयावर मत व्यक्त करणं ही आपली परंपरा नाही. आपण कायद्याचं आणि न्यायालयाचं पालन करतो, अशी प्रतिक्रीया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

अभिनेत्री कंगना रानावतच्या बांद्र्यातील कार्यालयाच्या पाडकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मोठा झटका दिला आहे. कंगनाच्या इमारतीचे केलेले पाडकाम बेकायदेशीर ठरवत हायकोर्टाने बीएमसीने पाठवलेली नोटीसही अवैध ठरवली आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. योग्य वेळी सगळ्यांची उत्तर मिळतील, न्यायालयाच्या निर्णयावर मत व्यक्त करणं ही आपली परंपरा नाही. आपण कायद्याचं आणि न्यायालयाचं पालन करतो.

न्यायालयाच्या निर्णयावर मत व्यक्त करणं ही आपली परंपरा नाही: संजय राऊतएखादा निर्णय मनाला पटला नाही तरी आपण न्यायालयाचा आदर करतो. अशी आपली परंपरा आहे. महापालिकेच्या कारवाईबाबत निर्णय झाला असेल तर महापालिका उत्तर देईल. मी आधीही म्हणलं आहे कारवाई बीएमसीची होईल. या निर्णयाला महापालिका उत्तर देईल. तसेच लोकलच्या बद्दल विचारणा केली असता हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला तर योग्य होईल असा खोचक टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला आणि विरोधी पक्षनेत्यांना लगावला.


Full View
Tags:    

Similar News