#ResignModi: मोदींच्या विरोधात सोशल मीडियावर ट्रेंड, काय म्हटलंय नेटिझन्सनी
#ResignModi: मोदींच्या विरोधात सोशल मीडियावर ट्रेंड, काय म्हटलंय नेटिझन्सनी #ResignModi trends in India on Twitter देशात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. आज देशात 19 लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासात 1 हजार 619 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशावर इतकं मोठं संकट आलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. असं म्हणत नेटिझन्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनामा द्या. असा ट्रेंड ट्विटरवर सुरु आहे. या ट्रेन्डमध्ये 2 लाख 79 हजार लोकांनी ट्विट केले आहेत. दीदी के बोलो या व्हिरिफाइड अकांउट वरून एक ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटर अकांउटवरून एक कविता ट्वीट करण्यात आली आहे. या कवितेतून मोदींवर निशाणा साधला आहे.